नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) च्या बाजूने आणि विरोधात उत्तर पूर्व दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराबाबत विरोध दर्शवणारे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा डोळ्यासमोर ठेवून हा हिंसाचार करण्यात आल्याची शंका गृह मंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्याद्वारे ट्रम्पसमोर भारताची वाईट प्रतिमा मांडण्याचा कट रचला गेला. अशी शंका गृहमंत्रालयाने व्यक्त केली आहे. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिस आयुक्त या घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. असे गृहमंत्रालयाने म्हंटले आहे.
भारताची प्रतिमा खराब करण्यास कोण जबाबदार आहे ?
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट लक्षात घेऊन नियोजित पद्धतीने हा कट आखण्यात आला होता. मी त्याचा निषेध करतो. सरकार असा हिंसाचार सहन करणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. गृह मंत्रालय त्यांचे निरीक्षण करीत आहे. तेथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमची मुख्य प्राथमिकता दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखणे ही आहे. ज्यांचा पोलिसाची हत्या, दगडफेक , मालमत्ता जाळण्यात हात आहे त्यांच्या विरुद्ध गृहमंत्रालय कडक कारवाई करणार आहे. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी, कॉंग्रेस पार्टी आणि सीएएचा निषेध करणार्यांनी सांगावे की भारताची प्रतिमा खराब करण्यास कोण जबाबदार आहे ? दिल्लीतील हिंसाचाराबद्दल केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले की वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. तेथे पुरेशी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे.
MHA sources: Violence in North-East Delhi orchestrated most likely with an eye on US President Trump's visit to India. MHA & Delhi Police Commissioner are in touch and expected to get a grip on the situation soon. Police Commissioner is monitoring situation from the Control Room
— ANI (@ANI) February 24, 2020
अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांकडे दाद मागितली
झाफराबाद आणि मौजपुरमधील हिंसाचाराच्या वृत्तांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले की दिल्लीच्या एका भागातून शांतता व सलोख्याला हानी पोहोचविणारी चिंताजनक बातम्या येत आहेत. कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मी उपराज्यपाल आणि गृहमंत्र्यांना आवाहन करतो.
महिलांनी मेट्रो स्टेशनवर निदर्शने सुरू केली
जाफराबादमध्ये दीड महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला तंबू लावत महिला सीएएच्या विरोधात निषेध करत होत्या . त्यांनी शनिवारी रात्री झफराबाद रोड बंद केला. रविवारी सकाळी पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलल्यानंतर मौजपूर ते सीलमपूर हा रस्ता उघडला, पण सीलमपूर ते मौजपूर हा रस्ता बंदच राहिला. दरम्यान, जाफरबाद मेट्रो स्थानकाअंतर्गत आंदोलनकर्त्यांनी धरणे धरले आहे
काय आहे प्रकरण ?
भाजप नेते कपिल मिश्रा मौसपूर लाल बत्ती येथे सीएएच्या समर्थनार्थ नगरसेवक कुसुम तोमर व इतर समर्थकांसह धरणे आंदोलनाला बसले. यावेळी, कबीर नगर आणि कर्डमपुरी येथून मौजपूर तिराहे येथे सुमारे 100 मीटर अंतरावर लोक जमा होऊ लागले. त्यांनी सीएएच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान कपिल मिश्रा यांच्या आंदोलनावर दगडफेक करण्यात आली आणि लोक कपिल मिश्राच्या समर्थनार्थ बाबरपूर-मौजपूर येथून जमा होऊ लागले. दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.यमुनापारमधील अनेक भाग रविवारी दिवसभर धुमसत होते. यामध्ये झफरबाद, मौजपूर, बाबरपूर, करावल नगर प्रमुख होते. येथे सीएएविरोधी आणि समर्थक समोरासमोर आले. यामुळे तेथे दगडफेक व हिंसाचार झाला.
सोमवारीही हिंसाचार सुरूच होता
दिल्लीच्या विविध भागात सोमवारी निदर्शने सुरू होती. झाफराबाद रोड, भजनपुरा आणि मौजपूर येथे हिंसक निदर्शनांच्या वेळी दोन घरांना आग लावण्यात आली आणि पेट्रोल पंप उडवून दिले. हिंसाचारात एक रतनलाल नामक पोलिस ठार झाला, तर डीसीपी यांच्यासह अनेकजण जखमी झाले. मौजपूर हिंसाचारादरम्यान सुमारे 37 पोलिस जखमी झाले. शाहदराचे डीसीपी अमित शर्मा यांच्या डोक्याला खोल दुखापत झाली आहे. एसीपी गोकुळपुरी यांनाही दाखल केले आहे. हिंसक निषेधांमुळे उत्तर-पूर्व जिल्ह्यातील 10 पोलिस स्टेशन भागात कर्फ्यू लागू करण्यात आला.