नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – गोल्ला, गोल्लेवार यादव समाजाच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भव्य राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भोकर तालुक्यातील पांडुर्णा येथील शहीद जवान मारोती राजेमोड यांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार दिला जाणार असून नायगाव तालुक्यातील देगाव शिवराम भंडरवाड यांना शौर्य पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नामदेव आयलवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण व कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमात राजमाता जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी हळदी कुंकू, वधू-वर नोंदणी केली जाणार आहे.
या वेळी आंध्रप्रदेशचे माजी सभापती डॉ. ए. चक्रपाणी, हैदराबादचे सेलिब्रीटी सी. लड्डूभाई यादव, आ. सौ. के. पौर्णिमा यादव, हैदराबादचे महापौर बी. राममोहन यादव, तेलंगणाचे दिग्दर्शक डॉ. रविकिरण यादव, तेलंगणा महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीदेवी यादव, आ. अमिताताई चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ. डी. पी. सावंत, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण, आ.हेमंत पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, आ.तुषार राठोड, आ.प्रदीप नाईक, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ.सुभाष साबणे, महापौर शीला भवरे, बापूसाहेब गोरठेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, माधवराव जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, संतुकराव हंबर्डे, संजय कौडगे, गंगाधर ठक्करवाड, राजेश पवार, सटवाजी माचनवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला गोल्ला-गोलेवार यादव समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गोल्ला-गोलेवार यादव समाज सेवा संघटना नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.