नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेएनयू मधील विद्यार्थी शरजील इमामला दिल्ली पोलिसांनी जहानाबाद येथून अटक केली असून यापूर्वी पोलिसांनी त्याच्या भावाला आणि ताब्यात असलेल्या मित्राची चौकशी केली होती. जहानाबाद कोर्टात हजर झाल्यावर आता दिल्ली पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला घेऊन जातील. शरजीलने देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे दिल्लीसह सहा राज्यात आरोप दाखल करण्यात आले आहेत.
शरजीलने आपल्या एका भाषणात आसामसह संपूर्ण उत्तर-पूर्व भारत उर्वरित भारतापासून तोडण्याविषयी बोलत होते. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरजीलविरुध्द सहा राज्यांमध्ये देशद्रोह आणि धर्माच्या आधारे बेईमानीचा प्रचार करण्यासह अनेक गंभीर आरोप असून एफआयआर नोंदवण्यात आले आहे. मंगळवारी त्याला बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आले आहे.
शरजील हा मूळचा बिहारच्या जहानाबादचा असून त्याचे वडील अकबर इमाम हे सत्ताधारी जनता दल युनायटेडचे नेते होते. अकबर इमाम यांनी जेडीयूच्या तिकिटावर जहानाबाद येथून विधानसभा निवडणुकही लढवली. शरजीलचे काका राजकारणाच्या चष्म्यातून या प्रकरणाकडे बघतात. त्यांच्या मते दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्याचा पुतण्या गैरफायदा घेत असून शरजीलची आई त्याला निर्दोष मानते. देशविरोधात उचललेले कोणतेही पाऊल सहन केले जाणार नाही. याबाबत कायदा आपले काम करेल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार शरजीलच्या अटकेबद्दल म्हणाले आहेत.
Visit : bahujannama.com