पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आंबेगाव भागात रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पकडलेली कार आणि हातभट्टी तोतया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक जवान महिलेने पोलीस ठाण्यात येऊन कारवाई न करताच सोडवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात एस. आर. पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिनाज शेख या तोतया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे राज्य उत्पादन शुल्क विभागात उपअधीक्षक आहेत.
दरम्यान नोव्हेंबर 2019 मध्ये भारती विद्यपीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रगस्त घालत होते. त्यावेळी आंबेगाव बुद्रुक येथील सच्चाइमाता मंदिराजवळ एक कार संशयितरित्या आढळून आली. त्यामुळे त्यांनी कार चालकास विचारपूस केली. तर कारची झडती घेतली. यावेळी 5 कॅन भरून हातभट्टी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी कार व त्या चालकाला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी सुरू असतानाच एक महिला तेथे आली. तिने आपण राज्य उत्पादन शुल्क विभागात असून उपनिरीक्षक असल्याची बतावणी केली.
तसेच त्याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत त्याला घेऊन देखील गेली. त्यांनतर त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान याबाबत भारती विद्यपीठ पोलिसांनी याप्रकरणाची माहिती घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनतर पोलिसांनी चौकशीकरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक निरीक्षक भोसले या तपास करत आहेत.