SBI चा अलर्ट ! पूरग्रस्तांना मदत करत असाल तर ‘हे’ नक्की वाचा , बँक खातं होऊ शकतं ‘रिकामं’, ही काळजी घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक राज्यात पूराने धुमाकूळ घातला आहे. अनेकांचा यात मृत्यू झाला आहे तर कोटींची संपत्तीही यात बरबाद झाली आहे. सरकारने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सामान्यांना आवाहन केले आहे. तुम्हीही जर पूरग्रस्तांना मदत करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण तुम्हाला हे महागात पडू शकतं. देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना ट्विट करत सावधानी घ्यायला सांगितली आहे.
फसवणुकीपासून अशी काळजी घ्या
– SBIने ट्विट करत म्हटलं आहे की, जर तुम्ही पूरग्रस्तांना मदत करत असाल तर या गोष्टीची खात्री करा की, तुम्ही ऑफिशियल रिलीफ फंड व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPAs) ने रक्कम देत आहात. डोनेशनसाठी आलेली रिक्वेस्ट व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर ऑफिशियल व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेसवर पैसे ट्रान्सफर करा.
Want to help the people affected by any natural calamity? Ensure your donations are made to the official Relief Fund Virtual Payment Addresses (VPAs) and/or accounts, and avoid falling prey to fraudsters.#StateBankofIndia #Donation #Official #OfficialVPAs #CMDRF #SafetyTips pic.twitter.com/iouLJKv5N9
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 13, 2019
हे करू नका
– अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जी अज्ञात स्त्रोतातून ईमेलच्या माध्यमातून आली आहे. यात चुकीचा आणि नुकसान पोचवणारा कोड असू शकतो. हा एक फिशिंग हल्लाही असू शकतो.
– एका पॉप अप विंडोच्या रुपात आलेल्या कोणत्याही पेजवर कसलीही माहिती भरू नका.
– फोन किंवा ईमेलद्वारे नको असलेल्या विनंतीला प्रतिसाद म्हणून आपला पासवर्ड कधीही देऊ नका.
– पासवर्ड, पिन, टिन इत्यादी माहिती पूर्णपणे गोपनीय आहे आणि बँक कर्मचाऱ्यांना किंवा सेवा कर्मचाऱ्यांनाही ती माहिती नसते. त्यामुळे अशी माहिती कोणी विचारत असेल तर देऊ नका.
हे करा
– अॅड्रेसबार मध्ये योग्य तो युआरएल टाईप करून साईटवर लॉग इन करा.
– अधिकृत साईटवरच आपला लॉगइन आयडी आणि पासवर्ड टाका.
– युजर आयडी आणि पासवर्ड देण्याआधी खात्री करा की, लॉग इन पेजचं युआरएल ‘https://’text ने सुरु होत आहे आणि हे ‘http://’ असं अजिबात नाहीये. ‘S’ म्हणजे सेफ, सुरक्षित. हे या गोष्टीची पुष्टी करतं की, पेजमध्ये एन्क्रिप्शनचा वापर करण्यात आला आहे.
– फोन किंवा इंटरनेटवर आपली खासगी माहिती तेव्हाच द्या जेव्हा कॉल किंवा सत्र सुरु केलं आहे आणि समोरच्या व्यक्तीची तुम्ही विधीवत पुष्टी केली आहे.
– हे लक्षात असू द्या की, तुमच्या अकाऊंटच्या माहितीची पुष्टी बँक ईमेलने कधीच करणार नाही.
Comments are closed.