नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक अर्थात भारतीय स्टेट बँक (SBI) सामान्य लोकांना अनेक प्रकारच्या बचत योजना उपलब्ध करून देत असते. एसबीआयच्या या बचत योजनांपैकी एक म्हणजे एसबीआय एन्यूटी स्कीम्स. या योजनेंतर्गत आपण एकदा गुंतवणूक केल्यास नियमित वेळेसाठी मासिक उत्पन्न मिळवू शकता. न्युइटी पेमेंटमध्ये ग्राहकाने जमा केलेल्या रकमेवर निश्चित रक्कम व्याज मिळाल्यानंतर उत्पन्न मिळू लागते. एसबीआयच्या या योजनेत मासिक न्यूइटीसाठी किमान एक हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूकीला कोणत्याही मर्यादा नाही.
SBI च्या या न्युइटी स्कीममध्ये ३६, ६०, ८४ किंवा १२० महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येईल. या गुंतवणूकीवरील व्याज दर निवडलेल्या कालावधीच्या मुदत ठेवीसाठी समान असेल. या योजनेचा लाभ घेणार्या ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास अकाली पैसे काढण्यासही परवानगी आहे. या योजनेअंतर्गत ठेवींच्या ७५ टक्के कर्जदेखील घेतले जाऊ शकते. दरम्यान, कर्जाचा पर्याय निवडल्यानंतरही, संपूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत भविष्यातील न्युइटीचे पेमेंट कर्ज खात्यात जमा केले जाईल.
Make a lump sum payment once and for the entire tenure of the Annuity Deposit Scheme enjoy numerous benefits. To know more, visithttps://t.co/13pRBgvbkp pic.twitter.com/zHdELPsL82
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 8, 2019
या योजनेत दुसर्या शाखेत खाते हस्तांतरित , टीडीएस नियम फक्त एफडी नियमांवर आधारित असतील. वार्षिकी जमा योजना आवर्ती ठेव योजनेच्या अगदी उलट आहे. आवर्ती ठेवीमध्ये ठेवीदार दरमहा निश्चित रक्कम जमा करते आणि मुदतपूर्तीनंतर काही रक्कम प्राप्त होते. दरम्यान, न्युइटी मॅच्युरिटीच्या बाबतीत ही रक्कम एकाच वेळी जमा करावी लागेल आणि निवडलेली मुदत पूर्ण झाल्यानंतर दरमहा एक निश्चित रक्कम प्राप्त होईल. एफडीच्या बाबतीत ठेवीदार निश्चित कालावधीसाठी रक्कम जमा करतात. मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम व्याजासह परत केली जाते.
Visit : bahujannama.com