नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी(customer) एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना(customer) स्वस्तात पाच लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन काढता येणार आहे. देशात पसरलेल्या कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने ही खास ऑफर आणली आहे.बँकेने या कर्जसेवेला ‘कोव्हिड पर्सनल लोन’ (Covid Personal Loan) असं नाव दिलं आहे. या कर्जाची विशेष बाब म्हणजे याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिक्योरिटी देण्याची गरज नाही.
कोरोनाच्या संकट काळात अनेकांना पैशांची चणचण भासते, पैशांची कोणालाही चणचण भासू नये यासाठी बँकेने हे पाऊल उचललं आहे.
इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते पगारदार, पगार नसणारे आणि निवृत्तीवेतनधारकांना कोविड-19 च्या उपचारांसाठी अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकेल.
कर्जाचा व्याज दर आणि कालावधी
बँक ग्राहकांना हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी देते.
या कर्जावर ग्राहकाला 8.5 टक्के दराने व्याज आकराणी केली जाईल. याशिवाय अनसिक्योर्ड वैयक्तिक कर्जाचे दर 10 ते 16 टक्क्यांपर्यंत आहेत.
कसा करायचा अर्ज
तुम्ही हॉस्पिटल बिल बँकेमध्ये दाखवून हे कर्ज घेता येईल. तुमच्या पेमेंटची स्थिती आणि क्षमता घेऊन बँक तुम्हाला कर्ज देईल.
या व्यतिरिक्त तुम्ही कोरोना रुग्णाच्या उपचार खर्चाची अंदाजे रक्कम देऊनही या सुविधेचा लाभ घेऊ शकता, जी बाँकेत घेऊन जावी लागेल आणि कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
यात बँका 25 हजार ते 5 लाख रुपयापर्यंतची कर्ज देऊ शकतात. कर्जासाठी मान्यता आणि ते नाकारण्याचा अधिकार बँकेकडे असेल.
हे कर्ज कोणाला मिळेल
एसबीआय प्रमुख दिनेश खारा आणि इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन राज किरण राय यांची रविवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली.
यामध्ये या कोव्हिड पर्सनल लोन संदर्भात महात्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
कोव्हिड पर्सनल लोनला पब्लिक सेक्टर बँकांच्या बोर्डाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.
हे कर्ज पगारदार आणि पगार नसणाऱ्या अशा दोन्ही गटातील व्यक्तींना मिळणार आहे.
दबंग नवरी ! अगोदर केली फायरिंग नंतर वराला वरमाला घातली, पहा वायरल व्हिडिओ
बदलला BSNL चा हा प्लॅन, आजपासून रोज मिळेल 1GB च्या ऐवजी 2GB डेटा
लोणीकंद परिसरातून जबरी चोरी करून पसार झालेल्यांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, 7.25 लाखाचा ऐवज जप्त
भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’
धक्कादायक ! बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल