नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या जगात उद्योजकता हा असा शब्द आहे ज्यासाठी सगळेच उत्सुक असतात. सगळ्याना आपला व्यवसाय करावासा वाटत असून त्यांना सेल्फमेड बनायचे आहे. पण व्यवसाय विकासाच्या वाटेत सुरुवातीला इन्व्हेस्ट करण्यासाठी पैशांची वाट बघणे सर्वात मोठी अडचण आहे.
जर तुम्ही या समस्येतून जात असाल तर, तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय आयडियाबद्दल माहिती मिळेल. ज्याची सुरुवात तुम्ही २ लाख पेक्षा कमी बजेट सहजपणे मिळून जाईल. काही व्यवसाय असे असतात ज्यासाठी ६० टक्के सबसिडी दिली जाते. अशातच जर तुमच्याकडचे २ लाख रु. लावत सरकारच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.
तांदूळ आणि कढीपत्ता मेकिंग यूनिट : तांदूळ आणि कडी पावडर मेकिंग युनिटसाठी सरकार ६० टक्क्यांपर्यंत लोन देऊ शकते. हे युनिट लावण्यासाठी तुम्हाला ६ लाख ५५ हजार रुपयांची गरज लागेल. ज्यात तुम्हाला १ लाख ६६ हजार रु. तुमच्याकडून लावावे लागतील. बाकीचे ३ लाख ३२ हजार आणि उर्वरित भांडवलासाठी तुम्हाला भारत सरकारकडून लोन घ्यावे लागेल. हे लोन मुद्रा स्कीमअंतर्गत कोणत्याही बँकेतून मिळेल. तुम्ही मुद्रा वेबसाइटवर जाऊन प्रोजेक्ट फाईलनुसार आपली लोन स्कीम निवडू शकता आणि ऑनलाईन अर्जही करू शकता.
टोमॅटो सॉस मॅन्युफॅक्चरिंग युनिट : या युनिट व्यवसायाच्या सुरुवातीला फक्त १ लाख ९५ हजार रु. स्वतःकडून लावण्याची आवशक्यता असून व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला एकूण ४ लाख ३६ हजार उर्वरित भांडवलाची गरज असते. ज्यात तुम्हाला स्वतःकडून दीड लाख रु. लावण्याची गरज आहे. उर्वरित पैसे तुम्ही भारत सरकारकडून कर्ज म्हणून घेऊ शकता. यासाठी भारत सरकार तुम्हाला मुद्रा योजनेंतर्गत कर्जही पुरवते आणि त्यावर ६० % अनुदान देते.
१ लाख १० हजार लावत सुरु करा आयुर्वेदिक युनिट – भारत सरकार आयुर्वेद विज्ञानाला वाढवण्यासाठी तत्पर असून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध केले जाईल. सोबतच लोनची व्यवस्थाही केली जाईल. जर तुम्ही आयुर्वेदिक कॅप्सूल बनवण्याचे युनिट सुरु करणार असाल तर तुमच्याकडचे १ लाख १० हजार रु. लावावे लागतील. बाकीचे ४ लाख ४७ हजार तुम्हाला भारत सरकारकडून लोनच्या स्वरूपात दिले जातील. यात तुम्हाला अनुदान दिले जाते. लोन म्हणून दिलेल्या रकमेमध्ये शेड बनविण्याच्या किंमतीचा समावेश आहे. याद्वारे आपण एका वर्षात सहजपणे १५ लाख रुपये मिळवू शकता.
आयुर्वेदिक चूर्ण बनवण्याचे यूनिट – आयुर्वेदात जास्तकरून औषधे चूर्णाच्या रूपातच असतात. भारत सरकार आयुर्वेदाला वाढवायचे असून आयुर्वेदिक चूर्ण बनवण्यासाठी युनिट सुरु केल्यावर तुम्हाला लोनची रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्यावर व्याजदरही खूप कमी असेल.
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अहवालानुसार हे काम सुरू करण्यासाठी तुम्हाला ४ लाख ७६ हजार रु. खर्च येईल. त्यापैकी आपल्याला १ लाख २५ हजार रु.ची व्यवस्था करावी लागेल. बाकी तुम्हाला कर्ज म्हणून दिले जाते. हे आपल्याला वर्षभरात सुमारे ३ लाख ५० हजार रु. चे उत्पन्न होईल.
राइस प्रोसेसिंग मिल – भारतात तांदळाचा खप जास्त असून तांदूळ उद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकार लोकांना लोन आणि अनुदानाची व्यवस्था करत आहे. याच्या सुरुवातीला एकूण ४ लाख ४५ हजार रु. किंमत असेल. ज्यासाठी तुम्हाला तुमच्याकडचे केवळ १ लाख १० हजार रु. लावावे लागतील. उर्वरित रक्कम कर्जाच्या स्वरूपात सरकारकडून दिली जाईल. या प्रकल्पांतर्गत तुम्ही ३७० क्विंटल तांदळावर प्रक्रिया केल्यावर त्याची एकूण किंमत ४ लाख ४५ हजार रु. येते आणि यामुळे तुमची वर्षाची विक्री ५ लाख ५४ हजार रु.पर्यंत होते.