काय स्वस्त, काय महाग?
* केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आजपासून पाच लाख रुपये होणार आहे.
* जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधीन घरांचा कर १२ वरुन ५ टक्क्यांवर आला आहे. तर परवडणाऱ्या घरांचा कर ८ टक्क्यांवरुन १ टक्का झाला आहे.
* एकाच व्यक्तीच्या नावावर असलेली दोन घरं आजपासून करमुक्त होणार आहेत. पूर्वी एखादा व्यक्ती दुसऱ्या घराच्या भाड्यावर पैसे कमवत असल्याचं समजून त्याच्याकडून कर वसूल केला जात होता.
* टीडीएसची मर्यादा वाढवून ४० हजार करण्यात आली आहे. बँकेत आणि पोस्टात पैसे गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
* ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार नोकरी बदलल्यास पीएफ खातं आपोआप ट्रान्सफर होणार आहे.
* नॅशनल पेन्शन स्कीमला EEE म्हणजेच एग्जेंप्ट-एग्जेंप्ट-एग्जेंप्ट दर्जा मिळणार आहे. याचा अर्थ नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटी पिरीयड पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही.
* गॅसच्या किंमतीत आजपासून १० टक्क्यांची वाढ होणार आहे. गेल्या तीन वर्षातली ही सर्वाधिक दरवाढ आहे. यामुळे सीएनजी आणि स्वयंपाक घरातील पाईप गॅसही महाग होणार आहे.
* टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांच्या किंमतीतही २५ हजारांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे.
* रेल्वेत आजपासून संयुक्त पॅसेंजर नेम रेकॉर्ड म्हणजेच पीएमआर मिळणार आहे. ज्यानुसार एखादा प्रवासी एका मागोमाग दुसरा रेल्वे प्रवास करणार असेल तर एकच पीएनआर असणार आहे.