बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरात वाढत असलेल्या प्रदुषणादरम्यान केंद्र सरकारने सुद्धा प्लास्टिकवर बॅन लावला आहे…अशावेळी तुम्ही पेपर कपचा बिझनेस करू शकता. सध्या पेपर कप बिझनेसला खुप डिमांड (profitable business)आहे. याशिवाय या बिझनेसमध्ये तुम्ही कमी पैशात जास्त नफा मिळवू शकता. खास गोष्ट ही आहे की, पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावण्यासाठी सरकारसुद्धा मुद्रा योजनेंतर्गत मदत करत आहे.
केंद्र सरकारकडून प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी येणार्या खर्चापासून होणार्या नफ्यापर्यंत संपूर्ण कॅलक्युलेशन दिले आहे. या बिझनेसबाबत सविस्तर जाणून घेवूयात –
किती जमीन आहे आवश्यक
हा बिझनेस करण्यासाठी 500 चौ.फुट एरियाची आवश्यकता असते.
एकुण खर्च किती
मशिनरी, इक्विपमेंट, फिस इक्विपमेंट व फर्नीचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री आपरेटिव्हसाठी खर्च – 10.70 लाख रुपये.
वर्कर्सला दिला जाणारा पगार
जर तुम्ही तुमच्याकडे स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही प्रकारचे वर्कर ठेवत असाल तर सुमारे 35000 रुपये महिना यावर खर्च होतील.
रॉ मटेरियलवर खर्च : 3.75 लाख रुपये
युटिलिटीजवर खर्च : 6000 रुपये
अन्य खर्च : 20,500 रुपये
किती नफा मिळवू शकता
जर तुम्ही हा बिझनेस सुरू केला आणि वर्षातील 300 दिवस काम केले तर तुम्ही सुमारे 300 दिवसात 2.20 कोटी युनिट पेपर कप तयार करू शकता. याशिवाय प्रति कप किंवा ग्लास सुमारे 30 पैशांना विकू शकता.
सरकार करणार मदत
केंद्र सरकारच्या मुद्रा लोनकडून या बिझनेससाठी मदत सुद्धा मिळू शकते. म्हणजे तुम्ही लोन घेऊन सुद्धा बिझनेस सुरू करू शकता. मुद्रा लोनच्या अंतर्गत सरकार व्याजावर सबसिडी देते. या योजनेंतर्गत एकुण प्रोजेक्ट कॉस्टच्या 25 टक्के स्वत:ला गुंतवणूक करावी लागेल. मुद्रा योजनेंतर्गत 75 टक्के लोन बँक देते.
कुठे मिळते मशीन
कागदाचे कप बनवण्याची मशीन दिल्ली, हैद्राबाद, आग्रा आणि अहमदाबादसह अनेक शहरात मिळते. अशाप्रकारच्या मशीन्स तयार करण्याचे काम इंजिनियरिंग वर्क करणार्या कंपन्या करतात.