बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रत्येक दिवाळीत किंवा एखाद्या मोठ्या सणाला बॉलिवूडमधील 3 खानपैकी एकाचा तरी सिनेमा रिलीज होताना दिसत असतो. या दिवाळीला हे तिन्ही मोठे स्टार(stars) मिसिंग आहेत. आता सर्व जबाबदारी राजकुमार राव, दिलजीत आणि बॉबी देओलवरसारख्या कलाकारांवर आहे. या दिवाळीला याच सर्वांच्या सिनेमांचा धमाका पाहायला मिळणार आहे. त्यांचे कोणते सिनेमे किंवा वेब सीरिज आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. कोरोना काळात सुपरस्टार(stars) कल्चर संपलं आहे.
1) आश्रम 2 (Aashram 2) – बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम ही वेब सीरिज 11 नोव्हेंबर रोजी एम एक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे.
2) लुडो (Ludo) – अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याचे दिवाळीला 2 सिनेमे रिलीज होणार आहेत. राजकुमारचा लुडो हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. यात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हेदेखील दिसणार आहेत.
3) मोदी सीजन 2 – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ही वेब सीरिज लुडोला टक्कर देताना देण्यासाठी रिलीज करण्यात आली आहे. यात महेश ठाकूर यानं पीएमचा रोल साकारला आहे.
4) छलांग (Chhalaang) – 13 नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमात पुन्हा राजकुमार राव दिसणार आहेत. यात तो पहिल्यांदाच नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) सोबत काम करताना दिसणार आहे. सिनेमात त्यानं पीटी टीचरची भूमिका साकारली आहे.
5) सूरज पे मंगल भारी (Suraj Pe Mangal Bhari) – दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) चा सूरज पर मंगल भारी हा सिनेमा राजुकमारला टक्कर देताना दिसणार आहे. यातील मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) च्या विविध लुकनं आधीच खूप लक्ष वेधलं आहे.