याबाबत माहिती अशी, एसटी कामगारांच्या संपामुळे नांदेडमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काल (गुरुवारी) दिलीप वीर (Dilip Veer) यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. परंतु, ते हजर झाले नाही. आपल्यालाही आता निलंबित केले जाईल या तणावात ते होते. कुटुंबातील लोकांनाही त्यांनी याबाबत सांगितले होते. मागील अनेक दिवसापासून ते तणावात होते. दिलीप यांना दोन मुलं दोन मुली आहेत. (ST Workers Strike)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काल दिलीप हे बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आले होते. सायंकाळी अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. आंदोलन स्थळावरून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सूरु असतांना आज (शुक्रवारी) सकाळी त्यांचा मृत्यू (Died) झाला. ही बातमी कळताच बसस्थानकात मोठ्या संख्येने कर्मचारी जमले. मृत दिलीप वीर यांचा मृतदेह बस स्थानकात आणून ठेवण्यात आला.
दरम्यान, या ठिकाणी राज्य शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने विलीनीकरणाची मागणी मान्य करावी. मयत दिलीप वीर यांच्या कुटुंबाला तातडीने 50 लाख रुवयांची रोख मदत करावी. जोपर्यत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली. दरम्यान, नांदेडमध्ये अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
Web Title :- ST Workers Strike | st workers strike one more employee died he was fall during agitation in nanded
Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र ! राष्ट्रवादी देणार भाजपला अध्यक्षपद?
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी