अजय गुजर म्हणाले, 21 ऑक्टोबर 2021 नुसार 4 नोव्हेंबर पासून पुकारलेल्या संपाला (ST Workers Strike Called Off) आज 45 दिवस झाले आहेत. गेल्या 45 दिवसांत संप शांततेत पार पडला. दरम्यान, परिवहन मंत्र्यांसोबत आमच्या दोन-तीन वेळेस चर्चा झाल्या. त्यानंतर काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. त्यांनी विलीनिकरणाबाबत जो निर्णय होईल तो मान्य करण्याचं ठरवलं. राज्य शासनामध्ये विलीनिकरणावर (merger) आम्ही ठाम आहोत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विलिनीकरणाचा निर्णय आता कोर्टात प्रलंबित असल्यानं आणि कोर्टानं यासाठी 12 आठवड्यांचा अवधी दिल्यानंतर 20 जानेवारी पर्यंतचा हा काळ आहे. त्यातच आज हायकोर्टात समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाला. यावर दिवसभर आमच्या चर्चा झाल्या यामध्ये कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. संप काळात निलंबन (Suspension) झालेल्या कर्मचाऱ्यांवरील (MSRTC) कारवाया रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचं लेखी आश्वासन अनिल परब यांनी दिलं आहे. तसेच इतर मागण्याची चर्चेतून सोडवण्यात येतील असंही आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.
Web Title :- ST Workers Strike Called Off | st strike msrtc workers strike finally called off settle after 54 days marathi news