सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सणासुदीच्या हंगामामुळे ग्रामीण भागात सध्या एसटी बसमधील प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. त्यात साताऱ्याजवळ एसटी बसच्या ड्रायव्हरला गाडी चालवत असतानाच हार्टअॅटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बस चालवत असताना छातित वेदना होत असल्याने ड्रॉयव्हर बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकाला जाऊन धडकली. दरम्यान एस.टी.च्या ड्रायव्हरवर उपचार सुरू असून यामध्ये दोघेजण जखमी आहेत. विकास मारूती पवार (वय ३९) असे या बस ड्रॉयव्हरचे नाव आहे.
मुंबई ते कराड असा प्रवास करणाऱ्या एसटी बसचा साताऱ्यातील खिंडेवाडीजवळ अपघात झाला. खिंडेवाडी जवळ सकाळी दहा च्या सुमारास एसटी आल्यानंतर दुभाजक पार करून रस्त्यावर जात असताना अचानक एसटी चालकाच्या छाती मध्ये दुखू लागल्याने ही बस एका झाडाला जाऊन आदळली. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकीवरून येणारी महिला किरकोळ जखमी झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नसून अपघातातील जखमींसह चालकाला सातारा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हार्टअॅटॅक आल्यामुळे चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिवाळीमुळे सुटीवर गेलेले लोक. आणि खराब रस्ते यामुळे ड्रायव्हरवर मोठा ताण येतो. गाड्यांची स्थितीही अतिशय खराब आहे, कामाचा ताण, खराब रस्त्यांमुळे धोका पत्करून गाडी चालवावी लागते. त्याबरोबर अनेक आजारांनीही ग्रासलं आहे. त्यामुळे बसच्या अपघातात दिवसेंदवस वाढ होत आहे. त्यामुळे आतातरी लक्ष देणार का याकडे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष वेधल आहे.