बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणात अंमली पदार्थांचा (ड्रग्स) वापर समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
अभिनेता सुशांतच्या आत्महत्येचा तपास करताना मुंबई पोलिसांनी ड्रग्स विषय समोर का आला नाही, पोलिसांनी दुर्लक्ष केले की कोण्या ड्रग्स माफियाला वाचवायचे होते. मुंबई पोलिसांना कुठल्या नेत्याला वाचायवायचे होते? याचे उत्तर राज्य सरकारनं द्यावे, अशी मागणी भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोदेखील लवकरच तपास सुरू करत आहेत. ते ड्रग्स अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी आता सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे.