पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल दोन महिन्यांपासून राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोर करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी एसपीओंनी नागरिकांना समजावून सांगण्याची भूमिका घ्यावयाची आहे. पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते, त्यावेळी एसपीओची मदत घेतली जात आहे. एसपीओंनी नागरिकांच्या भावनेचा आदर करून वागले पाहिजे. नागरिकांना त्रास होणार नाही आणि सरकारी काम सुरळीत होईल, असा समन्वय ठेवून एसपीओंनी नागरिक-पोलिसांना सहकार्य करायचे आहे, असे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.
हडपसर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले विशेष पोलीस अधिकारी यांची आज (मंगळवार, दि. २६ मे २०२१) सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, राजू अडागळे आणि हडपसर पोलीस स्टेशनअंतर्गत ३७ एसपीओ उपस्थित होते.
कदम म्हणाले की, पोलिसांना मदतनीस म्हणून आपण काम करत आहोत, याची जाणीव ठेवून विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी काम करायचे आहे. नाकाबंदी दरम्यान कोणाही वानचालकाच्या वाहनाची चावी काढून घ्यायची नाही, शिवीगाळ किंवा अरेरावीची भाषा वापरायची नाही, नागरिकांना मदत करण्यासाठी आपण आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवायचे आहे. कोणीही हातामध्ये लाठी घेणार नाही, काही अडचण आली तर लगेच सोबत असणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क करून द्यावा, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर स्वतः करणे अपेक्षित आहे, अशा मार्गदर्शक सूचना सर्व एसपीओंना दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोरख कामठे (एसपीओ) म्हणाले की, पोलीस प्रशासन २४ बाय ७ कार्यरत आहे. प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आम्ही एसपीओ म्ह