नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत इशारा दिला आहे. यामध्ये सांगितले, की महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत वाढ झाली. गेल्या 7 दिवसांत छत्तीसगडमध्ये कोरोनाचे नवे प्रकरण समोर आले आहेत. तसेच या राज्यात गेल्या 24 तासांत 259 नवे प्रकरणे समोर आली आहेत.
याबाबत आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की केरळमध्ये दररोज नवे प्रकरणे समोर येत आहेत. तर गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6112 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात शनिवारी (आज) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रासारखेच पंजाबमध्येही सात दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. या राज्यात 24 तासांत 383 नवे प्रकरणे समोर आली आहेत. मंत्रालयाने पुढे सांगितले, की 13 फेब्रुवारीपासून मध्य प्रदेशातही दररोज नवे प्रकरण समोर येत आहे. या राज्यात गेल्या 24 तासांत 297 नवे प्रकरण समोर आले आहेत.
18 राज्यांत कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
मंत्रालयाने सांगितले, की 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचा संसर्ग होऊन एकही मृत्यू झाला नाही. देशभरात 24 तासांत एकूण 13,993 प्रकरणे समोर आले आहे. यादरम्यान 101 जणांचा मृत्यू झाला. देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाली आहे.