बहुजननामा ऑनलाईन टीम – Sperm Count | पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीची अनेक कारणे (causes of infertility) असू शकतात. परंतु यापाठीमागे एक प्रमुख कारण लठ्ठपणा (obesity) असते. अनेक आजारांचे मुळ असलेला लठ्ठपणा पुरुषांच्या टेस्टोस्टेरोन (testosterone) ला थेट प्रभावित (affects) करतो, ज्यामुळे स्पर्म काऊंट कमी (lowers sperm count) होतो. लठ्ठपणा स्पर्म काऊंट कमी करण्यासह त्यांची हालचाल (motility) सुद्धा कमी करतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पॅरिसच्या 2012 च्या एका संशोधनानुसार फर्टिलिटी वाढवण्यासाठी पुरुषांनी काही खास उपाय केले पाहिजेत. हे उपाय कोणते जाणून घेवूयात…
1. हेल्दी खा-
पुरुषांनी आपल्या जीवनशैलीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. डाएटमध्ये फळे, भाज्या, प्रोटीन, धान्य आणि डेअरी प्रॉडक्टचा समावेश करा. फिजिकली अॅक्टिव्ह राहावे.
2. कॅफीनची मात्रा कमी करा –
कॅफीनमुळे मोठ्या प्रमाणात स्पर्म काऊंट आणि त्याची कॉलिटी कमी होते. कॉफी पिणे टाळावे.
3. एक्सरसाइज करा –
जास्त तणाव घेतल्याने स्पर्म प्रॉडक्शनचा परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिकदृृष्ट्या फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. रोज योग, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग करा. एक्सरसाईजमुळे लठ्ठपणा कमी होतो. लठ्ठपणा हे इनफर्टिलिटीचे प्रमुख कारण आहे.
4. स्मोकिंग सोडा –
सिगारेटमुळे स्पर्म काऊंट कमी होतो, त्याची हालचाल कमी होते. यासाठी हे व्यसन ताबडतोब सोडा.
5. फोलेटची मात्रा वाढवा –
शरीरात फोलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे स्पर्म असामान्य होतात. यामुळे मिसकॅरेज किंवा जन्मावेळी मुलाला समस्या येऊ शकतात. फोलेटसाठी आपल्या खाण्यात बीन्स, हिरव्या पालेभाज्या, धान्य आणि आंबट फळांचा समावेश करा. प्रयत्न करा की रोज किमान 400 मिलीग्राम फोलिक अॅसिड घेतले जाईल.
Web Title :- Sperm Count | low testosterone levels fall in sperm count fat gain
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 204 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास