मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– NCP Leader Nawab Malik | कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी (Financial Abuse Allegations Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आले. दरम्यान आज (शुक्रवार) मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) तात्पुरता दिलासा दिला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास कोर्टाने परवानगी दिली असली तरी त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नवाब मलिकांना (NCP Leader Nawab Malik) वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयामध्ये अर्ज केला होता. किडनीच्या आजारामुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचं त्या अर्जात म्हटलं आहे. त्याचवेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.
Special PMLA court allows Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik to get treated at a private hospital.
Malik's lawyer requested a private hospital medical treatment, to which ED didn't object, keeping some conditions. pic.twitter.com/AcZLfw6rts
— ANI (@ANI) May 13, 2022
दरम्यान, मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात (Criticare Hospital, Mumbai) नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने अखेर परवानगी दिली आहे.
परिवारातील एका व्यक्तीला मालिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यासही न्यायालयाने मुभा दिली आहे.
उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Web Title :- special pmla court allows ncp leader nawab malik to get treated at a private hospital
हे देखील वाचा :
Pune Police | पोलीस कोठडीत आरोपीला मारहाण करणारा पोलीस अंमलदार निलंबित
Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर
Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा