नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अंतराळात दोन सॅटेलाईटमध्ये टक्कर होणार होती. अमेरिकन सॅटेलाईटने रस्ता बदलण्यास नकार दिला. युरोपियन स्पेस एजंसीचं म्हणणं आहे की, अमेरिकन कंपनी स्पेसएक्सने आपल्या स्टारलिंक सॅटेलाईटचा रस्ता बदलण्यास नकार दिला आणि युरोपियन सॅटेलाईटला रस्ता बदलण्यास मजबूर केले. या घटनेनंतर अंतराळातील सुरक्षेबाबत अनेक सवाल उपस्थित होताना दिसले.
अॅलन मस्कची कंपनी स्टारलिंक सॅटेलाईटद्वारे जगभरात मोफत इंटरनेट सेवा देण्याची योजना आहे. युरोपियन सॅटेलाईटसोबत होणाऱ्या टक्करबाबत बोलताना स्पेसएक्स म्हणाली, “सुरुवातीला टक्कर होण्याची शक्यता खूपच कमी होती. परंतु नंतर वाढली.” स्पेसएक्सने सांगितले की, एका बगमुळे स्टारलिंक सॅटेलाईटचा ऑपरेटर मेसेज पाहू शकला नाही. आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
स्टारलिंक सॅटेलाईटपासून वाचण्यासाठी युरोपियन एजन्सीने आपल्या सॅटेलाईटचा अल्टीट्युड वाढवला. यामुळे एक सॅटेलाईट दुसऱ्याच्या वरून निघून गेला. युरोपियन एजन्सीचं म्हणणं आहे की, यामुळे Aeolus सॅटेलाईटच्या कार्यावर(हवामानाची माहिती देणं) कोणताही परिणाम झाला नाही.
स्पेसएक्सचं स्टारलिंक सॅटेलाईट प्रोग्राम डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. याअंतर्गत दोन स्पेस इंटरनेट सॅटेलाईट लाँच करण्यात आले आहेत. आगामी काळात हजोरोंच्या संख्येत लो ऑरबिट सॅटेलाईट लाँच केले जाऊ शकतात. यामुळे पृथ्वीवर हायस्पीड इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.