पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Spa Center In Pune |स्पा सेंटरमधील (Spa Center In Pune) मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश (Exposed) केला आहे. या कारवाईत 8 मुलींची सुटका करण्यात आली असून मसाज सेंटर (Massage Center) चालवणाऱ्या महिलेसह मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बाणेर मधील बालेवाडी फाटा येथील कणक स्पा सेंटर (Kanak Spa Center) येथे बुधवारी (दि.8) करण्यात आली. या कारवाईत 9 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरमध्ये (Spa Center In Pune) सुरु असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.
या प्रकरणी मसाज सेंटरची मालकीण (वय-45) आणि मॅनेजर निकित मोतिलाल अगरवाल (वय-24 रा. सेक्टर नं.24, फ्लॅट नं.38, प्राधिकरण, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील बालेवाडी फाटा (Balewadi Fata Baner) येथे कणक स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घेण्यासाठी डमी ग्राहक पाठवण्यात आला. कणक स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत 8 पीडित मुलींची सुटका करण्यात आली.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan),
पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हनमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, संदिप कोळगे, प्रफुल्ल गायकवाड, महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, निलम शिंदे, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाणे यांच्या पथकाने केली.
Web Titel :- Spa Center In Pune | racket exposed at ‘Kanak Spa’ center in Baner, Pune; Release of 8 girls.
Pune | मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करा – मअनिस