पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – वाकड येथील व्हिजन मॉलमध्ये (Vision Mall) स्पा सेंटरच्या (Spa Center In Pimpri Chinchwad) नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेतील (Pimpri Chinchwad) युनिट चारच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश (Exposed) केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.5) पाचच्या सुमारास व्हिजन मॉलमधली ऑनर वेलनेस स्पा सेंटर (Honor wellness spa Center) येथे करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी दोन जणांवर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.
संतप्रताप रामाप्रताप सिंग Santpratap Singh (वय-37 रा. रुम नं. 05 सुदर्शन कॉलनी, मोरेवस्ती, साने चौक, चिखली) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे.
तर एका महिलेवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष संजय देशमुख (API Ambrish Deshmukh) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील (Pune-Bangalore highway)
भूमकर चौकातील व्हिजन मॉलमधली गाळा नं. 230 मधील ऑनर वेलनेस स्पा सेंटरमध्ये
मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला.
त्यावेळी आरोपी 6 महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन संतप्रताप सिंग याला अटक केली.
पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळे करीत आहेत.
Web Title : Spa Center In Pimpri Chinchwad | racket under the name of spa center exposed in Pimpri Chinchwad Honor wellness spa Center
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
EPF |EPF अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत
Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’