साऊथ ‘सुपरस्टार’ धनुषची हॉलिवूडमध्ये लांब उडी ! Netflix वरील सिनेमात ‘या’ 2 दिग्गजांसोबत करणार काम

बहुजननामा ऑनलाइन टीम – साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) नं आता हॉलिवूडमध्ये लांब उडी घेतली आहे. लवकरच धनुष नेटफ्लिक्सवरील द ग्रे मॅन सिनेमात राय गोसलिंग आणि क्रिस इवांस अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करतान दिसणार आहे. अँथनी आणि जो रूसो या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. 2009 साली आलेल्या मार्क ग्रीनीच्या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.
धनुषनं ट्विटरवरून या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. एक नोट शेअर करत त्यानं लिहिलं की, नेटफ्लिक्सव (Netflix) रील द ग्रे मॅन सिनेमा जॉईन केल्यानं खुश आहे. या अॅक्श सिनेमाला घेऊन लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. जगभरातील माझ्या चाहत्यांचे आभार असंही तो म्हणाला आहे.
@netflix @netflixindia @russo_brothers @ryangosling @chrisevans @preena621 pic.twitter.com/LK5u5ZnUG0
— Dhanush (@dhanushkraja) December 18, 2020
एका वृत्त संस्थेनुसार, नेटफ्लिक्स जेम्स बाँड सारखे मोठी आणि भव्य फ्रेंचायजी डेवलप करण्याची योजना बनवत आहे. यासाठी 200 मिलियन डॉलरचं बजेट ठेवण्यात आलं आहे. या प्रोजेक्टची कमान मात्र अँथनी आणि जो रूसो यांच्याकडे असणार आहे.
https://twitter.com/NetflixFilm/status/1337477706015883266?s=20
धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2018 साली आली आलेल्या द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फरीर या इंग्रजी सिनेमात काम केलं आहे. केन स्कॉटनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. आता लवकरच तो द ग्रे मॅन मध्ये झळकणार आहे. याशिवाय तो आनंद एल रायच्या अतरंगी रे या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहेत.
Comments are closed.