बहुजननामा ऑनलाईन- दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी भारताचे माजी फंलदाज अमोल मुजुमदार यांची निवड करण्यात आली आहे. मुजुमदार यांची रणजी ट्रॉफीतील खेळी पाहून त्यांना या संघाच्या प्रशिक्षकपदी निवड कऱण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरु्ध भारत तीन कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली कामगिरी करावी, या उद्देशाने मुजुमदार यांच्याकडं फलंदाजी प्रशिक्षकपदाची धूरा सोपविण्यात आली आहे. याप्रसंगी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक कॉरी वेन जिल म्हणाले की, मुजुमदार यांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. आमच्या खेळाडूंना येणाऱ्या अडचणींचा, आव्हानांचा सामना कसा करायचा यासाठी संघाला ते नक्कीच चांगल प्रशिक्षित करतील. याआधीही त्यांनी अॅडन मार्करम, टेंबा बावुमा आणि जुबेर हमजा यांना फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षण दिलं आहे.
अमोल मुजुमदार यांनी पंचवीस वर्ष खेळाडू म्हणून मैदानावर खेळल्यानंतर आता पुढचे २५ वर्ष प्रशिक्षक म्हणून काम करत राहिल. या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुजुमदार यांनी मुंबईकडून खेळताना त्यांनी प्रथम श्रेणीत ११ हजार १६७ धावा केल्या होत्या. मुजुमदार यांच्याकडं बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं हाय परफॉर्मन्स कोचिंगचे प्रमाणपत्रदेखील आहे. तसंच नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी अंडर १९ आणि अंडर २३ संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. डिसेंबर २०१३ मध्ये नेदरलँडच्या संघाचं प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांनी २०१४ मध्ये निवृत्ती घेतली होती.