बहुजननामा ऑनलाइन टीम – सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) बीसीसीआय (BCCI) पदाचा कार्यभार काही दिवसांनी संपणार आहे. त्यांच्या जागी भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binney) यांची वर्णी लागणार आहे. मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. सौरव गांगुलीचा बीसीसीआय पदाचा कार्यभार संपणार आहे. यामुळे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांना आनंद झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय घडले होते ?
यापुर्वी ज्यावेळी विराट कोहलीला कर्णधार पद सोडावं लागलं होतं. त्यावेळी सौरव गांगुली अधिक चर्चेत आला होता. विराट कोहलीने जेव्हा कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी क्रिकेटविश्वात अधिक चर्चा झाली होती. त्यामुळे चाहत्यांनी अनेक प्रकारचे मीम्स (Memes) तयार केले आहेत. ते मीम्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर एका विराटच्या चाहत्याने ये करमा है असं म्हटलं आहे. तसेच त्याच्या अनेक चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत.
विराट कोहली सध्या मागच्या काही सामान्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
त्यामुळे विराट कोहली विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sourav Ganguly | yeh karma hai virat kohli fans brought a flood of memes after sourav gangulys exit from bcci president sport news
हे देखील वाचा :