नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभाग काही मिनिटांत पॅनकार्ड तयार करण्यासाठी सुविधा सुरू करणार आहे. यामध्ये, अर्जदाराचा तपशील आधारद्वारे घेतला जाईल, ज्यामुळे पॅनच्या तपशिलाची पडताळणी करणे सुलभ होईल. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पुढील काही आठवड्यात ही सेवा सुरू केली जाईल. याद्वारे ज्यांचे पॅन हरवले आहेत त्यांना पॅन कार्डही मिळणार आहे. त्यांना या सुविधेअंतर्गत काही मिनिटांत बनविलेले डुप्लीकेट पॅन मिळू शकते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की ‘इलेक्ट्रॉनिक पॅन’ (ePAN) सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. ई-पॅन बनविण्यासाठी आधार कार्डचे डिटेल्स व्हेरीफाय केले जाईल. हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी येईल. आधार मध्ये दिलेला डेटा जसे की पत्ता, वडिलांचे नाव आणि जन्मतारखेवर ऑनलाइन एक्सेस केला जाईल, पॅनकार्ड तयार करण्यासाठी काही मूलभूत माहिती व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाही.
पॅन जनरेट झाल्यानंतर, उमेदवारास डिजिटल स्वाक्षरीकृत ईपीएएन दिले जाईल, ज्यामध्ये क्यूआर कोड असेल. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बनावट आणि डिजिटल फोटो शॉपिंग रोखण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती एन्क्रिप्ट केली जाईल.
पायलट प्रोजेक्ट म्हणून, आठ दिवसांत ६२,००० हून अधिक ईपॅन जारी केले गेले आहेत, आता देशभरात याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की ही पायरी आयकर सेवांमध्ये अधिक डिजिटलायझेशन आणण्यासाठी आहे आणि कुठेही ना जात पॅनकार्ड बनवू शकतात.