बहुजननामा : ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांसाठी धावून गेलेल्या अभिनेता सोनू सूदने काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान राज्यपालांनी सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले आहे. लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून त्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याचे काम सूद गेल्या काही दिवसांपासून करत आहे. त्याचे काम कौतुकास पात्र असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले.
प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. pic.twitter.com/OnOL2qF5r3
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 30, 2020
राज्यभरात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेक परराज्यातील नागरिकांनी पायी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्रा, अभिनेते सोनू सूद त्यांच्या मदतीला धावला. त्याने स्वखर्चांतून वाहनांची व्यवस्था करुन मजूरांना मूळगावी पाठविले आहे. या कामगिरीमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोनू सूदला राजभवनात बोलाविले होते.
स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली,’ सोनू सूदच्या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खर्या आयुष्यात नायक ठरला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.