बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. तो सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत असतो. पूर आणि कोरोना कालावधीत त्रस्त झालेले लोक, त्यांच्या समस्या ट्विट करुन सांगत आहेत. यानंतर, सोनू सूद लोकांना मदत करण्यासाठी सक्रिय होतो. दरम्यान, सोनू सूदच्या नावावर अनेक फेक अकाउंट तयार करण्यात आले आहेत. अशाच एका अकाउंटवर सोनू सूद याची नजर पडली. या अभिनेत्याने आपल्या नाराजगी व्यक्त करुन फेक अकाउंट युजर्सला अटक करण्याविषयी बोलले आहे.
एका बरुण नावाच्या व्यक्तीने सोनू सूद याच्या पोस्टवर भाष्य करून मदत मागितली. या युजर्सचे म्हणणे आहे की, तो पुरामुळे बाधित आहे. त्याच्या कुटुंबाची प्रकृती खूपच वाईट आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सोनू सूद नावाच्या ट्वीट अकाउंटवरुन रिप्लाय केला गेला आणि काही मेल आयडी शेअर केले गेले. त्याचबरोबर बरुणकडून त्याची डिटेल माहिती मागितली गेली.
You will be arrested soon for cheating innocent people my dear. So stop your cheating business before it’s too late. https://t.co/5yWMXV3Agw
— sonu sood (@SonuSood) August 21, 2020
अभिनेता सोनू सूद नावाच्या या युजर्सच्या कृत्यावर खऱ्या सोनू सूदची नजर पडली. त्याने ट्वीट करून लिहिले आहे, ‘प्रिय, निर्दोष लोकांना फसविल्याबद्दल तुम्हाला लवकरच अटक केली जाईल. त्यामुळे उशीर होण्याच्या आतच आपला चिट्टिंगचा व्यवसाय बंद करा. ‘ विशेष म्हणजे यापूर्वी सोनू सूद याने लोकांना चेतावणी दिली होती की, काही लोक त्याच्या नावावर बनावट कामे करत आहेत. आणि लोकांकडून पैसे घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोनू सूदने लोकांची माफी मागितली होती. त्याचे म्हणणे आहे की, मेलच्या माध्यमातून त्याला एका दिवसात 1137 मदत संदेश प्राप्त झाले आहेत, तर फेसबुकवरून 19000, इंस्टाग्रामकडून 4812 आणि ट्विटरवरून 6741 संदेश प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत तो सर्वांना मदत करू शकत नाही. यासाठी त्याने त्या लोकांची माफी मागितली ज्यांना तो मदत करु शकला नाही.