तेलंगणा : वृत्तसंस्था – कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा माणसाचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. वयस्कर आई कोरोना संक्रमित झाली म्हणून तिला सोडून तिचे चार मुलं तिला सोडून फरार झाले. ही घटना तेलंगणा मधील आहे.
तेलंगणामध्ये कोरोनाचे संक्रमण अधिकच वाढत आहे. एक 82 वर्षीय महिला कोरोना संक्रमित झाली याची माहिती जेव्हा त्या महिलेच्या चार मुलांना समजली तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला शेतात एका वेगळ्या घरात राहण्यास मजबूर केलं. एवढ्यावरच न थांबता ते चारही जण आईला एकटीला सोडून तिथून फरार झाले.
त्या महिलेचं नाव लाचम्मा असल्याचं सांगितलं जातंय, तिला चार मुलं आणि एक मुलगी असे अपत्ये आहेत. ती बिना आधाराचं चालूही शकत नाही तरी तिला या परिस्थितीत एकटीला सोडून मुलं निघून गेले. ही महिला एकटीच वेलरू मंडलच्या पीचारा गावात शेतात असलेल्या विहिरीजवळ कसेबसे आपले दिवस काढत होती.
महिलेच्या मुलीने आपल्या आईची परिस्थिती ओळखून आईची देखभाल करण्यासाठी तिच्या गावात आली. तेलंगणा मध्ये मागील 24 तासात 1,802 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 1,42,771 जणांना कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत 895 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा मध्ये सध्या 31,625 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.