मुंबई : बहुजाननामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनी रझदान यांनी मंगळवारी संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरूला २००१ मध्ये ‘बली का बकरा’ का बनविण्यात आले. चौकशी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करूनही त्याला 2013 मध्ये फाशी का देण्यात आली. असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटलेले आहे की, हा न्यायाचा तमाशा आहे. जर तो निर्दोष असेल तर मग त्याला मृत्यूपासून कोण परत आणेल ?
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी म्हणाली, “अफझल गुरूला बळीचा बकरा का बनविण्यात आले याबद्दल ठोस चौकशी झाली पाहिजे.” असे म्हंटले आहे. आपले मत व्यक्त करताना त्यांनी या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “अफझलसारख्या लोकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी छळ व जबरदस्ती कशी केली जाते आणि नंतर त्यांना फाशीची शिक्षादेखील दिली जाते याची चौकशीही व्हायला हवी.”
त्यांचे हे ट्विट जम्मू-काश्मीरचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) दविंदरसिंग यांना ११ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर तीन दहशतवादी कारमध्ये असल्याचा आरोप आहे. त्यांच्याशी निगडित आहे. तिहार तुरुंगातून अफझल गुरूने त्यांचे वकील सुशील कुमार यांना लिहिलेल्या पत्रात दविंदरसिंग यांचे नाव घेण्यात आले होते. 9 फेब्रुवारी 2013 रोजी गुरूला फाशी देण्यात आली. अफजल गुरूला 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या संसदेच्या हल्ल्यात दोषी ठरवले होते. त्यामध्ये पाच दहशतवाद्यांसह 14 लोक ठार झाले होते. सिंग यांची सध्या एनआयएमार्फत चौकशी केली जात आहे.
Visit : bahujannama.com