मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज जगभर व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील सोशल माडियावरून एका स्पेशल व्हिडिओद्वारे व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहे. अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. कधी कधी त्यांच्या पोस्टचे कौतुक केले जाते तर कधी त्यांना ट्रोल व्हावं लागते. आज फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे त्या भलत्याच ट्रोल झाल्या आहेत.
काय आहे पोस्ट
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी एक इंग्रजी गाणं सादर केलं आहे जे त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर केलं आहे. ‘हेलो’ असं या व्हिडीओ साँगचं नाव आहे. लिओनेल रिची (Lionel Richie) यांचं मूळ गाणं आहे.या गाण्याचं चित्रीकरण अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आलं आहे. व्हिडीओ साँग शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, “Darkness cannot drive out darkness, only Light can do that ! Hate cannot drive out hate, only Love can do that ! Here’s a cover version of my favourite song by Lionel Richie …Just for You ! Enjoy it with LOVE ! Happy Valentine’s Day !” असं म्हणत त्यांनी सर्वांना वॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहे.
नेटकऱ्यांनी करून दिली ‘पुलवामा’ ची आठवण
अमृता यांच्या या गाण्यावर प्रतिक्रिया देताना श्रद्धा कदम लिहितात ‘पुलवामा शाहिद दिनाला हे गाणं लॉन्च करणं फारच भयंकर योगायोग आहे’. अशा पद्धतीने कमेंट करून त्यांनी अमृता फडणवीस यांना पुलवामा शाहिद दिनाची आठवण करून दिली आहे. अनेकांनी या व्हिडिओवर अमृता यांना पुलवामाची आठवण करून दिली आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काहींनी त्यांच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. एकानं म्हटलं आहे की, मिस्टर राजकुमारपेक्षा चांगला आवाज आहे. एकानं म्हटलं की, गाण्यात सुरवातीलाच कानात कानठळ्या बसल्या पुढे गाणं बंद केलं. मला वाटलं माझे हेडफोन खराब झालंय.
आणखी एकानं असं म्हटलं की, तुमचे म्युझिक व्हिडिओ खूप मनोरंजक असतात. कंमेंट वाचायला तर खूपच मजा येते”. काहींनी अनेक खराब – खराब कमेंटही केल्या आहेत.