नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये गणले जाणारा उत्तर प्रदेश मधील सोनभद्र जिल्हा आता जगाच्या नकाशावर आपली एक वेगळी ओळख घेऊन येत आहे. येथे भूगर्भशास्त्रज्ञांना दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी (Gold Ore) सापडल्या आहेत. परंतु ज्या ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत ती जागा म्हणजे विषारी सापांचा अधिवास आहे. जगातील सर्वात विषारी सापांच्या प्रजातींपैकी तीन येथे आढळतात – रसेल वाइपर, कॅरेट आणि कोब्रा येथे मोठ्या संख्येने आढळतात. सोनभद्र जिल्ह्यातील जुगल पोलीस स्टेशन परिसरातील सोने टेकडीच्या दक्षिणांचल दुद्धी तहसीलच्या माहोली विंधमगंज चोपण ब्लॉकमध्ये मोठ्या संख्येने सर्प असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसेल वाइपरची प्रजाती राज्यातील एकमेव सोनभद्र जिल्ह्यात आढळते. सोनभद्रचे डीएफओ वन्यजीव संजीव कुमार म्हणाले की, वनविभागाकडून ना हरकत (एनओसी) घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी या भागात किती विषारी साप आहेत हे तपासल्यानंतर सांगता येईल. त्यांनी सांगितले की यापूर्वी रसेल व्हीपर, कोब्रा आणि कॅरेट प्रजातींचे साप सापडले आहेत.
दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने केले जात आहे हवाई सर्वेक्षण
दरम्यान, सोन्याचे साठे शोधून काढल्यानंतर सरकारने या खाणी भाड्याने देण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. त्यांच्या खाणकामांसाठी, लिलाव प्रक्रियेपूर्वी जिओ टॅगिंगची (Geo Tagging) प्रक्रिया सुरू केली गेली आहे. या अनुक्रमे, जीएसआय खाणीच्या क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण करीत आहे. यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. वस्तुतः हवाई सर्वेक्षण करण्यामागील हेतू म्हणजे त्या भागातली काही जमीन वनविभागाच्या क्षेत्रात येते का ते पहावे लागेल. वनविभागाच्या क्षेत्रात आल्यास वनविभागाकडून ना हरकत(NOC) घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, त्यासाठी अधिग्रहणही करता येईल. यानंतर लीज प्रक्रिया सुरू होईल. अशा परिस्थितीत जगातील सर्वात विषारी सर्प जातींच्या आधिवासावर संकट ओढवले आहे.