नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या एकट्या आईसाठी योग्य वराची शोध घेत असलेल्या एका युवकाची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील फ्रेंच कॉलनीत राहणारा गौरव अधिकारी यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये आपल्या ४५ वर्षांच्या विधवा आईसाठी वर शोधण्याविषयी लिहिले आहे. १० नोव्हेंबर रोजी लिहिलेली पोस्ट ३४०० पेक्षा जास्त वेळा शेयर केली गेली आहे.
या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्यानंतर त्याची आई घरी एकटीच असते. तो एकटाच मुलगा असून दिवसभर नोकरी करत असल्यामुळे तो रात्रीच घरी येतो. त्याने यासाठी आईची परवानगी घेतली असून त्याने यामध्ये लिहिले आहे की, माझी आई डोला ही अधिकारी आहे. माझ्या आईसाठी मी एक जोडीदार शोधत आहे. त्याच्या आईला पुस्तके वाचणे आणि गाणे ऐकायला फार आवडते. जीवन एकटे जगण्यापेक्षा उत्तम पद्धतीने जगणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
या पोस्टमध्ये त्याने या भावी जोडीदारासाठी एक अट देखील ठेवली आहे. भावी साथीदार हा आत्मनिर्भर असावा. या पोस्टवरून अनेकजण माझ्यावर हसत असून माझा निर्णय मात्र मी बदलणार नाही. दरम्यान, फेसबुकवर हि पोस्ट टाकल्यानंतर अनेक डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक यांच्यासारख्या विविध जणांचे फोन आल्याचे त्याने सांगितले आहे.
Visit : bahujannama.com