नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेता म्हणून उदयास येताना दिसत आहेत. ते केवळ शानदार राजकारणीच नाही तर एक चांगले वक्ताही आहेत. मोदींबद्दल खूपच कमी लोकांना माहीत आहे की, शालेय दिवसांत त्यांना नाटक आणि अॅक्टींगमध्ये रस होता. याचा उल्लेख त्यांच्यावर लिहिलेल्या ‘The man of the moment: Narendra Modi by MV Kamath and kalindi Randeri’ पुस्तकात पाहायला मिळतो. याशिवाय मोदींनी स्वत: लिहिलेल्या एग्जाम वॉरियर या पुस्तकातही याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
PM मोदींनी शालेय दिवसांत केला नाटकात अभिनय
PM मोदींनी आपल्या पुस्तकात शालेय दिवसांचा उल्लेख करताना म्हटले की, “मला एक स्पेशल डायलॉग द्यायचा होता, ज्यासाठी मी संघर्ष करत होतो. त्यामुळे यामुळे नाटकाचे दिग्दर्शक हतबल झाले. जर मी असाच डायलॉग घेतल राहिलो तर ते मला दिग्दर्शित करू शकणार नाहीत. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी मी त्यांना माझ्यासारखा तो सीन करायला सांगतिले. जेव्हा दिग्दर्शकांनी तो सीन केला तेव्हा मला काही सेकंदातच लक्षात आलं की, मी कुठं चुकत होतो.”