बहुजननामा ऑनलाइन टीम – लोणीकंद पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास अवघ्या २४ तासांत अटक केली असल्याची माहिती लोणीकंद चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी गजानन चंद्रपाल ढगे वय 32वर्षे, रा. प्रशांत सोसायटी, मांजरी बुद्रुक, पुणे यांना दिनांक 29/01/2021 रोजी रात्री 9/45 वाजताचे सुमारास अज्ञात व्यक्तींनी कारला दुचाकी आडवी लावून फिर्यादी यांना खाली उतरवून कारला दगडाने व कोयत्याने मारहाण मारून कारचे काचा फोडून नुकसान करून फिर्यादीचे मित्र गणेश ढवळे यास देखील डावे खांद्यावर, उजवे हातावर व मांडीवर कोयत्याने मारहाण करून जखमी केले.तसेच फिर्यादी यांच्या खिशातील ATM, एर्टिगा गाडीची चावी व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 5700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे. याबाबत ढगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा गुन्हे शोध पथक कसून तपास करीत होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना वाघोली गावचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांना सदर गुन्ह्यातील एक संशयित व्यक्ती कुमार बिल्डर्स बांधकाम साईट येथे येणार असलेबाबत गुप्त बातमीदरमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे आदेशाने पोलिसांनी सदर व्यक्तीस शिताफीने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अभिजित उर्फ अभ्या महादेव कांबळे वय 26 वर्षे, रा. 72 घरकुल, मांजराई नगर, मांजरी बुद्रुक, पुणे असे सांगितले. सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे कडून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी क्रमांक MH12HX4583 ही जप्त करण्यात आलेली आहे. तसेच अभिजित कांबळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेवर यापूर्वी देखील लोणीकंद, हडपसर पोलीस ठाणे येथे चोरी व जबरी चोरीचे एकूण 02 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास 3 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करीत आहेत.
सदर कामगिरी मा.डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), विवेक पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), डॉ. सई भोरे पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभाग), प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विक्रम जाधव, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, निलेश शिंदे, योगेश भंडारे यांनी केली आहे.