• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Solapur News : तौफिक शेख आणि महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

by sheetal
January 6, 2021
in राजकारण
0
NCP

NCP

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत (NCP)आता सतत इनकमिंग सुरु झाले आहे. आता ‘एमआयएम’च्या माध्यमातून सोलापुरात शहरात आपल्या नावाचा डंका वाजवणारे तौफिक शेख यांनी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्यासोबत सोमवारी (४ जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली. लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन तौफिक शेख हे आपल्या नगरसेवकांसोबत सोलपुरातच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुसरीकडे, महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपचे अडचणीत आलेले उपमहापौर यांच्या जागी दुसऱ्या नगरसेवकाचा शोध सुरु असताना, शिवसेनेचा महापालिकेतील विरोधी पक्षनेताही बदलण्याचे ठरले आहे.

‘एमआयएम’ची ताकद विभागली

महापालिकेतील ‘एमआयएम’च्या दहा नगरसेवकांना सोबत घेऊन तौफिक शेख यांनी शहरातील विविध प्रश्नांवर पालिकेतील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पंरतु, पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीवेळी शेख यांनी महाविकास आघाडीला मदत केली. आता सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ठरले असताना चार नगरसेवकांनी पक्ष न सोडण्याचा निर्धार केला आहे.

महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेशातील अडथळा दूर

शिवसेनेने विधानसभेला डावलल्यानंतर महेश कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हा काही नगरसेवकांना सोबतीला घेत त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. तो निर्णय आता सुटला असून, कोठे यांना घेऊन आपण चार-पाच दिवसांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली आहे.

‘शहर उत्तर’वर महेश कोठेंचा डोळा

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून आपल्याला संधी मिळणार नाही याची खात्री कोठेंना झाली आहे. त्याअनुषंगाने आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शहर उत्तर मतदारसंघ आपल्यासाठी योग्य राहील, असा विश्वास कोठे यांना वाटू लागला आहे. म्हणूनच शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आपण निवडणूक लढवू शकतो, या हेतूने कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Tags: MaheshNCPSolapur NewsTaufiq Sheikhतौफिक शेखमहेश कोठेराष्ट्रवादी प्रवेश
Previous Post

पोलिस भरतीचा निर्णय ! SEBC तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; EWAS चा उल्लेखच नाही

Next Post

Pune News : पुण्यातील टेकड्यांवर पाळीव श्वानांना घेऊन जाण्यास बंदी

Next Post
dog-and-man

Pune News : पुण्यातील टेकड्यांवर पाळीव श्वानांना घेऊन जाण्यास बंदी

Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

NCP
राजकारण

Solapur News : तौफिक शेख आणि महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

January 6, 2021
0

...

Read more

दौंड: वाळकी गावात पुन्हा एकदा संतराज पॅनलचे वर्चस्व

2 days ago

संतापजनक ! 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नाल्यात फेकले, वरून दगड -काट्यांनी फेकले

4 hours ago

Pune News : शिवसेनेचे कार्यालय हे शाखा नसून न्याय मंदिरे आहेत : रविंद्र मिर्लेकर

2 days ago

Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता

5 days ago

इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार

6 days ago

Pune News : बंद फ्लॅट फोडणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat