सोलापूर (Solapur News) :बहुजननामा ऑनलाइन – Solapur News | ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने (Senior journalist Raja Mane) आणि सुधीर महाजन (Sudhir Mahajan) यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व मानपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी (दि.16) आयोजित करण्यात आला आहे. राजा माने-सुधीर महाजन गौरव सोहळा समिती सोलापूर (Solapur) यांच्या वतीने ‘संपादक गौरव सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) तसेच माजी सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
सोलापूर शहरातील द हेरिटेज गार्डन (The Heritage Garden) येथे दुपारी साडेबारा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते राजा माने आणि सुधीर महाजन यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य निमंत्रक शिवाजी सुरवसे (Shivaji Suravase) आणि सह निमंत्रक दत्तात्रय थोरे (Dattatraya Thore) यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन संतोष पवार, शंकर जाधव, प्रमोद पाटील, सचिन वायकुळे, चन्नवीर भद्रेश्वरमठ, संतोष उदगिरी, किशोर रच्चा यांनी केले आहे.
web title: Solapur News | Senior journalist and editor Raja Mane-Sudhir Mahajan’s retirement ceremony on Friday.
COVID-19 | इंग्लड दौर्यातील दोन क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; एक खेळाडू अजूनही विलगीकरणात