Solapur Crime News | सोलापूर हादरलं! एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेत केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नातेही सांगितले
सोलापूर : – Solapur Crime News | सोलापूर शहरात एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनी भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील कर्णिकनगर येथील ही घटना आहे. याबाबत आत्महत्येचे कारण समोर आले नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित ठणकेदार, अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण-तरुणीचे नाव आहे. मृत अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबीयांना मानलेला भाऊ अशीच करून दिलेली होती. मात्र, मृत रोहित याच्या कुटुंबीयांना अश्विनी बद्दल कोणतीही माहिती नसल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. ‘आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत, त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका’ असा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती आहे.
रोहित ठणकेदार हा चालक म्हणून काम करत होता. तर अश्विनी ही कर्नाटकातील एका महाविद्यालायत बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला. या प्रकरणाची सिव्हिल हॉस्पिटल पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस आत्महत्यामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास करत आहेत.



Comments are closed.