सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुरु केलेल्या महाजनादेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा काल सोलापूरमध्ये समारोप झाला . भर पावसात केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आगमन झाले. या यात्रेद्वारे भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले . या सभेत अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सभा आटोपल्यानंतर त्यांचा मुक्काम सोलापूरध्ये होता. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांची सलग तीन तास बैठक झाली.
सोलापूरमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोपात काल अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक, रणजितसिंह पाटील, काँग्रेस नेते जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . सभेनंतर गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यां तिन्ही नेत्यांची सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी तेथील एका बंद खोलीत या नेत्यांची तब्बल तीन तास चर्चा झाली. रात्री दहा वाजता सुरू झालेली हि बैठक एकपर्यंत सुरु होती. यावेळी भाजपचे प्रदेश संगठन मंत्री विजयराव पुराणिक, राज्य सहसंघटक व्ही. सतीश , तसेच राज्याचे प्रभारी भूपेंद्रसिंह यादव यांनी उपस्थिती लावली होती. या सहा नेत्यांमध्ये ही सभा घेण्यात आली.
दरम्यान , अमित शहा यांनी या महाजनदेश यात्रेच्या समारोप सभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कलम ३७० हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ठ करावी , असे आव्हान देखील शहा यांनी केले. तसेच त्यांनी शरद पवार यांच्या वर लक्ष्य केंद्रित करत , केंद्रात १० आणि राज्यात १५ वर्षे सत्ता असलेल्या काळात तुम्ही काय केले ? असा प्रश्न विचारला .
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या