पाटणा : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे विचित्र आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या घटना दररोज समोर येत आहेत. अशीच एक विचित्र घटना बिहारमधून समोर आली आहे. आजोळी राहणाऱ्या भाच्याचे आणि त्याच्या मामीचे (Maternal Uncle’s wife) एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर या दोघांनी त्यांच नातं, वय, आणि समाज याची तमा न बाळगता चक्क लग्न (Married to each other) केले. त्यानंतर ते दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर लग्नाचा व्हिडिओ (Video) त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. बिहारच्या (Bihar) जमुई गावात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घालत अन् अग्निभोवती सात फेरे घेऊन लग्न केले. या व्हिडिओत भाचा मामीच्या भांगेत कुंकू भरताना अन् मामी आपल्या नव्या पतीला वाकून नमस्कार करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रंचड व्हायरल झाला असून या अनोख्या लग्नाची चर्चा देशभर पसरली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबतची माहिती अशी की, मामा-मामी कामानिमित्त मुंबईत होते. त्यावेळी त्यांचा भाचा चंदन कुमार हा मामाच्याच घरी राहत होता. 22 वर्षीय चंदन कुमार हा रिक्षा चालवत होता. या काळात त्याचे आणि मामीच एकमेकांचे सूत जुळलं. त्यानंतर लॉकडाऊनमुळे तिघेही बिहारमधील आपल्या गावी परतले. त्याठिकाणी ही चंदन हा मामांच्या घरीच राहत होता. एकदा मामांनी या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल होतं. पण त्यानंतर गावात बोभाटा नको, म्हणून मामांनी सबुरीची भूमिका घेतली. मात्र हे दोघं लग्न करून त्याचा व्हिडिओ गावभर शेअर करतील, याची मामांनी कधी कल्पनाही केली नव्हती. लग्नानंतर पती-पत्नी झालेले भाचे- मामी दोघे थेट मुंबईला निघून गेल्याची चर्चा आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Web Title : social media a youngster in bihar gets married with his maternl uncles wife
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा