पुणे : बहुजननामा ऑनलाईन – परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Pune builder Avinash Bhosale) आणि कुटुंबियांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ही सर्व मालमत्ता समभागांच्या रुपात आहे. तर, हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Social Activist Anjali Damania) यांनी व्यक्त केलीय. (Action against Avinash Bhosle from ED just to put pressure on Ajit Pawar? )
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाल्या, अविनाश भोसले हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले (Pune builder Avinash Bhosale) यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा अथवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालया (ईडी) कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. CBI आणि ED या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे, अशी टीका दमानिया (Anjali Damania) यांनी केलीय. पुढे त्या म्हणाल्या, आताच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन A’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन B’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. यात किळसवाणं राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय असल्याचं म्हणत दमानिया (Anjali Damania) यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
पुढे दमानिया (Anjali Damania) या ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या, अविनाश भोसले (Pune builder Avinash Bhosale) यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता. असं त्यांनी (Anjali Damania) ट्विटद्वारे म्हणाल्या आहेत.
कोण आहेत अविनाश भोसले ?
अविनाश भोसले (Pune builder Avinash Bhosale) यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले (Pune builder Avinash Bhosale) यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (21जून) भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली 40 कोटी 34 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
Web Title : Social Activist Anjali Damania on ed avinash bhosale ncp ajit pawar bjp
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…
Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक; ‘या’ प्रकरणात आवळल्या मुसक्या