बहुजननामा ऑनलाइन टीम : आजकाल बहुतेक लोक नोकरीऐवजी स्वतःच्या व्यवसायाला प्राधान्य देतात. यासाठी केंद्र सरकारनेही बर्याच योजना सुरू केल्या असून सरकारच्या मदतीने कमी गुंतवणूकीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. त्यातील एक पर्याय म्हणजे साबण कारखाना, ज्यामध्ये आपण कमीतकमी गुंतवणूक करून जास्त मोबदला मिळवू शकता.
आजकाल खेड्यांपासून, लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत साबणाला मागणी आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चार लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात साबण तयार करण्याचा कारखाना सुरू करता येतो. याशिवाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून ८० टक्के कर्जही दिले जाऊ शकते.
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत केवळ कर्ज मिळवता येते. एकूण ७ महिन्यांत औपचारिकता पूर्ण करुन आपण उत्पादन सुरू करू शकता. मुद्रा योजनेच्या प्रोजेक्ट प्रोफाइल अहवालानुसार, १ वर्षात आपण सुमारे ४ लाख किलो उत्पादन करू शकतो. ज्याचे एकूण मूल्य सुमारे ४७ लाख रुपये असेल.
खर्च व इतर जबाबदऱ्या दिल्यानंतर तुम्हाला वर्षाकाठी ६ लाख रुपयांचा नफा मिळेल. हे युनिट स्थापित करण्यासाठी आपल्यास एकूण ७५० चौरस फूट क्षेत्राची आवश्यकता असेल. त्यात ५०० चौरस फूट फीट कवर्ड आणि उर्वरित क्षेत्र अनकवर्ड असेल. यात मशीनसह एकूण ८ उपकरणे लागतील. मशीन्स बसविण्याची एकूण किंमत फक्त १ लाख रुपये असेल.
हा संपूर्ण सेटअपसाठी एकूण १५ लाख ३० हजार रुपये खर्च येणार आहेत. यात जागा, यंत्रसामग्री, तीन महिन्यांच्या कार्यकारी भांडवलाचा समावेश आहे. यापैकी तुम्हाला केवळ ३ लाख ८२ हजार रुपये खर्च करावे लागतील, कारण उर्वरित कर्ज तुम्ही बँकांकडून घेऊ शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेकडून कर्ज मिळू शकते.