नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय दूरसंचार कंपन्यांच्या नवीन नियमांमुळे ग्राहकांना चांगलाच दणका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेवा क्षेत्रातील भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया या खाजगी कंपन्यांनी तीन डिसेंबरपासून आपल्या प्लॅनचे दर वाढविण्यासाची घोषणा केली आहे. तसेच रिलायन्स जियोनेदेखील ६ डिसेंबरपासून या अतिरिक्त दर वाढीची घोषणा केली आहे. ज्यामुळे मोबाईल कॉल आणि इंटरनेटचे दर ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील गेल्या पाच वर्षांतील पहिली दरवाढ असल्याचे समजते.
रिलायन्स जिओच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपल्या प्लॅनमध्ये अनेक सुविधा दिल्या होत्या. ज्यात व्हॉईस कॉल जवळपास मोफत करण्यात आला होता, तसेच डाटा दरात ९५ टक्क्यांनी कपात करीत प्रति जीबी दर २६९ रुपयांवरुन ११ रुपये ७८ पैसे करण्यात आला होता. या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या आपसातील दरयुद्धामुळे कंपन्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.दरम्यान, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने सध्याच्या प्री-पेड प्लॅनच्या जागी अमर्यादित श्रेणीतील नवीन दर घोषित केले आहेत. ज्यामुळे या दोन्ही कंपन्याची सेवा ५० टक्क्यांनी महाग होणार आहे. वोडाफोन आयडियाने प्री-पेड प्लॅन आणि सेवेसाठी नवीन दर घोषित केल्यानंतर भारती एअरटेलनेही आपल्या सर्व मोबाईल प्री-पेड प्लॅनचे दर वाढविण्याची घोषणा केली. वोडाफोन आयडियाने दूसऱ्या नेटवर्क केल्या जाणाऱ्या कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओची सेवाही ६ डिसेंबरपासून ४० टक्क्यांनी महागणार आहे.
एअरटेलचा वार्षिक प्लॅनमध्ये ४१.१४ टक्के वाढ करण्यात आल्याने यासाठी २,३९८ रुपये लागतील. मर्यादित डाटा प्लॅनसाठी आता ९८८ रुपयांऐवजी तीन डिसेंबरपासून १,४९८ रुपये द्व्यावे लागणार आहे . या प्लॅनमधील ही दरवाढ ५० टक्के आहे. तसेच ८२ दिवसांच्या अमर्यादित डाटा प्लॅन आता ६९८ रुपये करुन आता हा मर्यादित डाटा प्लॅन केला आहे. रिलायन्स जियोने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक प्रथम या तत्त्वावर आम्ही कायम असून ४० टक्के दरवाढ करण्यासोबत आम्ही ग्राहकांना अतिरिक्त ३०० टक्के फायदाही देणार आहोत. वोडाफोन आयडियाच्या निवदेनानुसार वार्षिक प्लॅनमध्ये ४१.२ टक्के वाढ केली आहे. कंपनीच्या या प्लॅनचा दर १,६९९ रुपयांवरुन २,३९९ रुपये असेल. तसेच रोज दीड जीबी डाटासह ८४ दिवसांच्या प्लॅनचा दर ३१ टक्क्यांनी वाढवून ४५८ रुपयांवरुन ५९९ रुपये केला आहे. १९९ रुपयांचा प्लॅनसाठी आता २४९ आकारले जातील.
Visit : bahujannama.com