नवी दिल्ली वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एका छोट्या मुलीचा व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्त होमवर्क दिला जात असल्याची तक्रार करत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी म्हणते, छोट्या मुलांना इतके काम दिले नाही पाहिजे. काश्मीरमध्ये राहणारी ही सहा वर्षांची मुलगी कोरोना काळात ऑनलाइन क्लासेस आणि शिक्षकांकडून देण्यात येणार्या कामामुळे कंटाळली आहे आणि यासाठी तिने पीएम मोदी यांना भावनिक आवाहन केले आहे.
खुप वेळ चालतो ऑनलाइन क्लास
व्हिडिओत मुलगी म्हणते, ‘अस्सलामु अलैकुम मोदी साहेब, मी मुलगी बोलत आहे. मी सहा वर्षांची आहे, मी झूम क्लास बाबत बोलू शकते. 6 वर्षांची जी मुलं असतात त्यांना जास्त काम का देतात. अगोदर इंग्रजी, गणित, उर्दू, ईव्हीएस आणि त्यानंतर कम्प्यूटरचा क्लास. मला 10 वाजेपासून 2 वाजेपर्यंत क्लास अटेंड करावा लागतो. इतके काम तर मोठ्या मुलांकडे असते.
https://twitter.com/NamrataWakhloo/status/1398587707794759680
मुलीने पीएमकडे तक्रार करत म्हटले की, छोट्या मुलांवर इतका भार का टाकला जात आहे. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तिने पीएम यांना मोदी साहेब म्हणून संबोधित केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. कोरोना काळात शाळा बंद आहेत आणि मुलांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. प्रत्येक वेळी मोबाइल किंवा लॅपटॉप समोर बसून मुले कंटाळली आहेत.
मनोज सिन्हा यांनी उचलले पाऊल
दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर संपला, 20 जूननंतर प्रकरणांमध्ये होईल वेगाने घट
तृतीयपंथीनेच केला तृतीयपंथीवर लैगिक अत्याचार; दोन गटातील वादातून मारहाण करुन लुटले
नव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर