भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिसा मधून पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास जाण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही भावांनी त्यांच्या बहिणीचा मृतदेह सायकलवर स्मशानभूमीत नेला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती पती सोडल्यानंतर ती आपल्या भावांबरोबर राहत होती.
दरम्यान मोती गावातील ४२ वर्षीय आदिवासी महिला नुआखाई पांडे हिचे आजारपणामुळे निधन झाले. पतीपासून लांब झल्यानंतर मृत नुआखाई आपल्या भावांबरोबर गावात राहत होती. बहिणीच्या निधनानंतर गावकऱ्यानी तिच्या अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. अगदी नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला.
शेवटी तिच्या दोन्ही भावांनी बहिणीचा मृतदेह सायकलवर नेत तिच्यावर अंतिम संस्कार केले. यावेळी दोन्ही भावांच्या व्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणीही उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे मनाला हादरा देणारी ओडिसाची ही पहिली घटना नाही. यापूर्वी, राज्यातील दानमांझी गावातील एक व्यक्ती रुग्णवाहिकेच्या अभावामुळे १० किलोमीटरपर्यंत आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरन घरी आणला. या घटनेची चर्चा संपूर्ण देशात होती.
Visit : bahujannama.com