नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – खेळण्यासाठी नदी काठावर (On the river bank) गेलेल्या चिमुकल्या बहिण -भावाचा (Sister-brother) नदीत बूडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) देवळी सांगवी येथे रविवारी (दि. 13) दुपारी ही घटना घडली. या घटनेने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.
आरुषी (वय 10) आणि अभिषेक नामदेव राऊत (वय- 7) अशी या बहिण- भावांची (Sister-brother) नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, देवळी सावंगी येथील नामदेव राऊत आणि त्यांची पत्नी दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुगीचे दिवस असल्याने नेहमीप्रमाणे ते दोघेही मजुरीसाठी शेतावर (On the farm for wages) गेले होते. आरुषी आणि अभिषेक ही दोन्ही मुले घरीच होती. दुपारी ते खेळण्यासाठी नदीच्या काठावर गेले. तेंव्हापासून हे दोघेही बेपत्ता होते. सायंकाळी पाचच्या सुमारास आई कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली. सायंकाळपर्यंत वाट पाहिली. पण तोपर्यंत मुसळधार पाऊस (rain) सुरू झाला. त्यामुळे मुले कोणाच्यातरी घरी असतील, असा विचार करून त्यांनी रात्र काढली. तरीही मुले सोमवारी सकाळपर्यंत परत न आल्याने नामदेव राऊत यांनी हिंगणा पोलीस स्टेशन (Hingna Police Station) मध्ये धाव घेत मुले हरवल्याची तक्रार दिली.
दरम्यान, नदीकाठावर मुलांचे कपडे आणि चपला दिसल्याचे गावातून एक जण सांगत आला. आई – वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली असता आपल्याच मुलींची कपडे असल्याचे त्यांनी ओळख पटविली. त्यानंतर नदी पात्रात शोध घेतला. त्यावळी सोमवारी दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. या घटनास्थळाचा पंचनामा करून हिंगणा पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. हिंगणा पोलीस तपास करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
parambir singh and mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयाकडून चा परमबीर सिंह यांना पुन्हा मोठा दिलासा, 22 जूनपर्यत अटक नाही
भगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम
दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना
Ajit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा