नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला ( Sidhu MooseWala Murder Case) याची 29 मे 2022 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याने जबाबदारी स्वीकारली होती. आता या गोल्डी ब्रार याचा ठावठिकाणा एफबीआयला लागला आहे. ब्रार कॅलिफोर्नियामध्ये असल्याची माहिती एफबीआयला मिळाली आहे. (Sidhu MooseWala Murder Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमेरिकेत एफबीआयने गोल्डी ब्रारचा शोध सुरू केला असून, एफबीआय लवकरच गोल्डी ब्रारला अटक करणार आहे. गोल्डी ब्रार अनेक वर्षे कॅनडात होता. तो तेथे बसून भारतात अनेक गुन्ह्यांची सूत्रे चालवत होता. त्याच्या विरोधात भारतात गंभीर गुन्हे नोंद आहेत. कॅनडातूनच त्याने सिद्धू मुसेवाला याची हत्या घडवून आणली होती. त्याची टोळी पंजाब आणि संपूर्ण भारतात सक्रिय आहे. गोल्डी ब्रारने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्याने सिद्धू मुसेवाला याची हत्या केल्याचे कबूल केले आहे.
पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली होती.
गोल्डी ब्रार सध्या कॅनडात लपून बसला असून, तो कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीने एका कथित फेसबुक पोस्टद्वारे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्रार 2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडात गेला होता. तेव्हापासून तो कॅनडात लपून बसला आहे. गतवर्षी विकी मिड्डूखेडा याची हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी मुसेवाला याला संपविण्यात आले, अशी प्राथमिक माहिती आहे. (Sidhu MooseWala Murder Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आप सरकारने मुसेवाला याच्यासह अन्य 424 लोकांची पोलीस सुरक्षा काढून घेतली होती.
त्यानंतर ही हत्या झाली होती. त्यामुळे आप सरकार भलतेच अडचणीत आले होते. मुसेवाला काँग्रेस नेते होते.
त्यांनी यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मानसा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक
लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
Web Title :- Sidhu MooseWala Murder Case | punjabi singer sidhu moose wala murder mastermind goldy brar has been detained in california sources gangster goldy brar arrest
हे देखील वाचा :
Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime | खिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून पत्नीला मारहाण; देवाच्या मूर्ती, फोटो नदीत बुडविले