अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम (Shrikant Chindam) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात (tofkhana police station ahmednagar) श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांच्यावर अॅट्रॉसिटीसह (Atrocity) विविध कलमांतर्गत हा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांच्यासह 30 ते 40 जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील एका टपरीचालकाने फिर्याद दिली आहे. टपरीचालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भागीरथ भानुदास बोडखे (वय-52 रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर 30 ते 40 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, 9 जुलै रोजी दुपारी सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले. भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम होते. श्रीकांत आणि श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी आणि क्रेन घेऊन आले. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली. ज्यूस सेंटरमधील सामानाची फेकाफेक केली. बोडखे यांनी मुलगा प्रतीक व पत्नी कविताला बोलावून घेतले. यावेळी श्रीपादने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक केली.
श्रीपाद छिंदम याने धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच इतरांनीही बोडखे कुटुंबाला शिवीगाळ केली. आरोपींनी टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील 30 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी टेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली व त्या ठिकाणी इतर 12 नवीन पत्र्याच्या टपऱ्या उभ्या केल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title : shripad chindam ahmednagar shripad chindam and 40 others booked for racist remarks
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update