बहुजननामा ऑनलाइन – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांचे वडील श्रीकृष्ण बिर्ला यांचे काल रात्री निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. श्रीकृष्ण बिर्ला (Shrikrishna Birla) यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्रीकृष्ण बिर्ला (Shrikrishna Birla) सरकारी कर्मचारी होते. ते सेल्स टॅक्स विभागातून सेवा निवृत्त झाले होते.
Lok Sabha Speaker Om Birla's father Shrikrishna Birla passes away.
— ANI (@ANI) September 29, 2020
ओम बिर्ला (Om Birla) यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीकृष्ण बिर्ला यांना आदरांजली वाहिली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, मी बिर्ला कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे या आशयाचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. आज सकाळी श्रीकृष्ण बिर्ला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
https://twitter.com/supriya_sule/status/1310996110245199877