बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवूडच्या (Bollywood) अभिनेत्री नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे तर चित्रपटाच्या झगमगटापासून लांब असले तरी सोशल मीडियावर असणारे त्यांचे ॲक्टिव्हनेस हे नेहमीच चाहतांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या अशाच पद्धतीचा काहीसा अनुभव अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) पाहायला मिळाला. अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) कित्येक दिवसांपासून सिनेसृष्टीतून लांब आहे. मात्र तिच्या साधेपणाने तिने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता श्रद्धा कपूर एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बॉलीवूडच्या अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. या सोशल मीडियाच्या फॉलोवर्स मध्ये कधी चढ उतार पाहायला मिळते. सध्या श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) या सोशल मीडियावर बाजी मारलेली पाहायला मिळाली. आलिया भट्ट (Alia Bhatt), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), कतरीना कैफ (Katrina Kaif) यासारखे बॉलीवूडच्या अनेक आघाडी अभिनेत्रींना मागे टाकत सोशल मीडियावर आपले स्थान श्रद्धा कपूर ने मिळवले. श्रद्धा कपूरचे इंस्टाग्राम वर सध्या 75 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. स्वतः श्रद्धा कपूरने या गोष्टीची पोस्ट करत माहिती दिली.
चित्रपटसृष्टी पासून श्रद्धा जरी लांब असली तरी ती तिच्या चाहत्यांच्या जवळ असल्याचा पुरावा या माध्यमातून
तिने दिला आहे. श्रद्धाची झलक ‘भेडिया’ चित्रपटातील ठुमकेशवरी या गाण्यात पाहायला मिळाली होती. यानंतर ‘बाघी 3’ या चित्रपटात श्रद्धाला शेवटी पाहण्यात आले होते. सोशल मीडियावर आलिया भट चे 72.4 मिलियन फॉलोवर्स तर दीपिकाचे 69.9 तर कॅटरिनाचे 68 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Web Title :- Shraddha Kapoor | shraddha kapoor has 75 million instagram followers leaves deepika katrina alia behind
हे देखील वाचा :
Boney Kapoor | बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा! म्हणाले ’25-30 दिवसात चित्रपट करणारे…’